“…अशा व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी राहण्याचा नैतिक अधिकार उरतो का?”; शिंदे गटाचा सवाल!

नवी दिल्ली : (Eknath Shinde On Uddhav Thackeray) एकीकडे राज्यात अधिवेशनामुळे वातावरण तापलेलं असतानाच दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणीमुळेही राजकीय वर्तुळात मोठी चर्चा चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. पक्षाचे प्रतोद, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचं कार्यक्षेत्र अशा अनेक मुद्द्यांवर नीरज कौल शिंदे गटाच्या बाजूने युक्तिवाद करत असून त्यांच्यानंतर मनिंदर सिंग हेही युक्तिवाद करणार आहेत.
ठाकरे गटाच्या वकिलांनाही सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रश्न विचारले होते. आज शिंदे गटाच्या वकिलांनाही प्रश्न विचारले. यावरून ठोस असा अंदाज बांधता येत नाहीये. पण न्यायालय सर्व बाजूंनी विचार करत आहे जेणेकरून दहाव्या परिशिष्टातील पळवाटांचा कुणाला गैरफायदा मिळू नये – उज्ज्वल निकम
आजची सुनावणी संपताना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आपल्याला अजून युक्तिवाद करायचा असल्याचं न्यायालयाला सांगितलं. त्यामुळे उद्या लंचब्रेकनंतर रिजॉइंडरच्या रुपाने कपिल सिब्बल पुन्हा सविस्तर युक्तिवाद करण्याची शक्यता आहे.