क्राईमपिंपरी चिंचवड

‘आप’च्या नेत्यावर धारदार शस्त्राने हल्ला; तीन अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात

पिंपरी : पिंपरी चिंचवडमधील आम आदमी पार्टीच्या सामाजिक न्याय शाखेचे अध्यक्ष यशवंत श्रीमंत कांबळे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की, शनिवारी दुपारी घरी परतत असताना तीन अल्पवयीन मुलांनी त्यांच्यावर धारदार शास्त्राने हल्ला केला. एफआयआर नुसार ही घटना शनिवारी दुपारी 1 वाजता फुगेवाडी येथे घडली.

‘आप’ने केलेल्या निषेधानंतर कांबळे हे त्यांच्या दुचाकीवरून परतत असताना मागून मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. घटनेनंतर कांबळे यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, गुन्ह्यात वापरलेले शस्त्रही जप्त केले आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी भास्कर जाधव म्हणाले, “हल्लेखोर सर्व अल्पवयीन आहेत. या हल्ल्यामागे राजकीय शत्रुत्व असू शकते असा आमचा विश्वास आहे.”

Related Articles

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये