क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“उद्धव ठाकरेंचा फ्रंटमॅन अनिल जयसिंघानी गजाआड आता संजय पांडे…” मोहित कंबोज यांचं ट्वीट चर्चेत

मुंबई : (Mohit Kamboj On Anil Jaysinghani) अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात बुकी अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे. गुजरातमध्ये जाऊन मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. यानंतर भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंच्या फ्रंटमॅनला अटक झाली आहे आता संजय पांडे आणि आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचा काऊंटडाऊन सुरू होता असंही मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंचा फ्रंटमॅन बुकी अनिल जयसिंघांनीला मुंबई पोलिसांनी अटक केली. आता माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आणि आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. तुम्ही लवकरच उघडे पडणार आहात. जे दुसऱ्यांसाठी खड्डे खोदतात ते स्वतःच एक दिवस त्या खड्ड्यात पडतात. या आशयाचं ट्विट मोहित कंबोज यांनी केलं आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याच्या प्रकरणात आणि लाच देऊ केल्याच्या प्रकरणात अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे. अनिल जयसिंघानी हा फरार होता. अनिल जयसिंघानीची मुलगी अनिक्षाला याआधीच अटक करण्यात आली आहे.

अनिल जयसिंघानी हा उल्हासनगरमधला क्रिकेट बुकी आहे. २०१० मध्ये अनिल जयसिंघानी छोटा बुकी म्हणून ओळखला जात होता. २०१० मध्ये बेटिंग करताना अनिल जयसिंघानीला अटक केली गेली होती. १९९५ ला अनिल जयसिंघानीने काँग्रेसच्या तिकिटावर उल्हासनगर पालिका निवडणूकही लढवली होती. २००२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनिल जयसिंघानीने प्रवेश केला. अनिल जयसिंघानीचे बड्या राजकीय नेत्यांशी संबंध, तसेच पोलीस अधिकाऱ्यांशीही चांगले संबंध. अनिल जयसिंघानी हा मागच्या सात-आठ वर्षांपासून फरार होता अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनीच सभागृहात दिली. अनिल जयसिंघानीच्या विरोधात विविध १५ गुन्ह्यांची नोंद आहे

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये