एमपीएसी विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरणार; पुण्यात उद्या राज्यव्यापी आंदोलन

पुणे : राज्यसेवा परीक्षेचा नवा अभ्यासक्रम पॅटर्न २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. ती मागणी नुकतीच मान्य करण्यात आली आहे. मात्र पुण्यात पुन्हा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं आहे.
एमपीएससी तांत्रिक विभाग परीक्षा पॅटर्न २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी उद्यापासून विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत. राज्यभरातील विद्यार्थी उद्या पुण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हे विद्यार्थी उद्या पुण्यातील बालगंधर्व चौकात उपोषणाला बसणार आहेत.
प्रशासन त्यांना जाणीवपूर्वक त्रास देत असून मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि सरकारला दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलनाला बसणार असल्याचं सांगितलं आहे.