ताज्या बातम्यापुणेरणधुमाळी

काटेंच्या विजयाने दादांना पुन्हा दणक्यात एन्ट्री करायची होती पण, कलाटेंनी डाव उलटवला!

पुणे : (Rahul Kalate On Ajit Pawar) चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल उद्या २ मार्च रोजी जाहीर होणार आहे. सामान्यांपासून अगदी राजकीय जाणकारांपर्यंत प्रत्येकाचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहेत. अनेक जाणकार व्यक्ती आपली मते व्यक्त करत निवडणुकीचा कल सांगत आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने देखील या संदर्भात आढावा घेण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी ही निवडणूक ग्राऊंडवरुन कव्हर केला त्या पत्रकारांच्या नजरेतून चिंचवडचा कौल काय सांगतो हे आम्ही जाणून घेतलं. निवडणुकीत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यामुळे झालेल्या मतविभाजनाचा फायदा भाजप उमेदवाराला होणार असल्याचं मत पत्रकार व्यक्त करत आहेत. जर कलाटे रिंगणात नसते तर अश्विनी जगताप आणि नाना काटे यांच्यात तगडी फाईट झाली असती. पण कलाटेंच्या उमेदवारीने जगतापांना ही निवडणूक सोपी गेल्याचं पत्रकार सांगत आहेत.

“नाना काटे आणि राहुल कलाटे यांच्यामधील मतांचा फायदा भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना होऊन त्या निवडून येतील. कलाटे हे मूळचे शिवसैनिक आहेत आणि त्यांना वंचितनेही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या हक्काच्या मतात वंचित-सेनेची मतं अॅड होतील. म्हणूनच मतांचे मोठं विभाजन पाहायला मिळणार आहे. नाना काटे आणि राहुल कालाटे यांची मते विभागली जाऊन अश्विनी जगतापांना मोठा राजकीय फायदा होईल अन् त्या विजयाच्या दिशेने कूच करतील”, असे मत राजकीय विश्लेषक व वरिष्ठ पत्रकार अविनाश थोरात यांनी व्यक्त केले आहे.

“राहुल कलाटे यांची उमेदवारी नाना काटे यांना त्रासदायक ठरू शकते. वंचितचीही मतं मोठ्या प्रमाणात कलाटे यांना मिळू शकतात. शिवाय कलाटे यांचं मोठं राजकीय वजन चिंचवडमध्ये आहे. जगतापांना भिडणारा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. गेल्या निवडणुकीत त्यांची मतं पाहून अनेकांच्या तोंडाला फेस आला होता. सध्याच्या परिस्थितीत नाना काटे यांना मिळणारी मतं कलाटे खाऊ शकतात, ज्याचा थेट फायदा अश्विनी जगतापांना होऊ शकतो. शिवाय भाजप पदाधिकाऱ्यांनी देखील जीव तोडून काम केलेले आहे. त्यामुळे भाजपला त्याचा फायदा नक्कीच होईल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये