हिस्टाॅरिकल

तब्बल शंभर वर्षांनी पुरंदर वाड्याला मिळाला उजाळा

सासवड : आपल्या गतकाळातील इतिहासाची साक्ष देत उभा असलेल्या सासवडच्या सरदार पुरंदरे वाड्यावर तब्बल शंभर वर्षानंतर नुकताच गुडीपाडवा साजरा झाला. नोकरी व्यवसायनिमित्त देश विदेशात विखुरलेली पुरंदरे यांचा अकरावा वंशज असलेल्या या परिवाराने एकत्र येऊन वाड्यावर गुढी उभारली असून एतिहासिक वाड्याला गतकालीन वैभवाचा पुन्हा उजाळा दिला गेला. अशा एतिहासिक वास्तुंना वर्षानुवर्षे जपण्याचा सुुंदर अनुभव या वास्तुद्वारे येत आहे. हा वाडा गेली दीडशे ते दोनशे वर्ष दुर्लक्षित पडलेल्या अवस्थेत ही आपल्या इतिहासाची झलक दाखवत उन, वारा, पावसात उभा होता.

सरदार पुरंदरे वाडा प्रती शनिवार वाडा…

ऐतिहासिक पेशवे कालीन सरदार पुरंदरे यांचा हा वाडा असुन याला प्रती शनिवार वाडा असे देखील संबोधले जाते. या वाडीला पेशवाईच्या काळात मोठ्या प्रमाणावर महत्त्व होते या ठिकाणी अनेक मसलती झाल्या. याच वाड्याच्या लगत सरदार कुंजीर यांचा वाडा असुन पलीकडे सरदार बोकील यांचा वाडा आहे. हे सर्व वाडे अत्यंत देखणे व पुरंदरच्या इतिहासात नोंद करुन ठेवण्यासारखे आहे. भव्य दिव्य दगडी चिरेबंदी भिंती असुन वाड्याच्या प्रवेश द्वाराजवळ द्वारपाल यांच्यासाठी दगडी चवथरा आहे. वाड्याचा दरवाजा अत्यंत भक्कम व याला मोठमोठे खड्डे आहेत याला दिंडी दरवाजा देखील आहे. अत्यंत सुंदर अशा वाड्याची मालकी सध्या पुरंदरे खानदानातील सासवड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष जयसाहेब पुरंदरे यांच्याकडे आहे.

चित्रपट कला क्षेत्रातील दिग्गजांनी या वाड्यात अनेक चित्रपट मालिका लघुपटाची निर्मिती केली. पाडव्याच्या मुहूर्तावर परिवारातील सदस्यांनी एकत्र येऊन पारंपरिक रिवाजानुसार पगडी प्रधान करून गुढी उभारून आपली संस्कृती जपल्याचे दिसते. यावेळी एक्के सर लिखित आणि अभ्यासीत पुरंदरचे धुरंदर या संशोधनपर ग्रंथ साहित्याची पुरंदर परिवाराला भेट देण्यात आली.

याप्रसंगी मराठी चित्रपट मालिका क्षेत्रातील प्रसिद्ध कला दिग्दर्शक संदीप इनामके यांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून वाड्यातील प्राचीन रचना स्थापत्य मुळे रचनातून उभ्या करून सदर वाडा सास्कृतिक ऐतिहासिक घटनात्मक कार्यक्रमाकरीता खुला करण्यात येणार असल्याचा मानस जगदीश पुरंदरे, मेधा पुरंदरे, माधुरी पुरंदरे, डॉ. अविनाश पुरंदरे यांनी यावेळी व्यक्त केली. काहीही असो पुरंदरच्या गतकालीन इतिहासाची वैभवशाली साक्ष देणारा सरदार पुरंदरे वाडा मात्र सासवडच्या सौंदर्यात भर घालेल यात जरादेखील शंका नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये