ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी
दिल्लीच्या राजकारणात मोठी घडोमोड! मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांचा राजीनामा…

नवी दिल्ली : दिल्लीतील केजरीवाल सरकारमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. केजरीवाल सरकारमधील उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री केजरीवाल यांनीही दोघांचा राजीनामा स्वीकारला आहे.
राजीनामा दिलेल्या दोन्ही नेते सध्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये आरोपी आहेत. दिल्ली मद्य धोरण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने अटकेला आव्हान देणारा सिसोदिया यांचा अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे.