क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्र

धक्कादायक! मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर केमिकल टँकरला भीषण आग; तीन जणांचा जागीच मृत्यू

मुंबई : (Mumbai Pune Express Highway Accident) मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर लोणावळ्याजवळ एका केमिकल टँकरला भीषण आग लागली. या दुर्घटनेत तीन जण दगावल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. भरधाव वेगात असलेला टँकर पलटी झाल्यामुळे त्याच्यातलं केमिकल पुलाखालच्या रस्त्यावर काम करणाऱ्या चार व्यक्तींवर पडलं, तसंच काही वाहनांवरही सांडलं, ज्यामुळे पुलाखालील वाहनांनी पेट घेतला.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील टँकरला (Mumbai Pune Express Highway Tanker Fire) लागलेल्या आगीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) ट्वीट करत म्हणाले, “मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या एका अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत तीन जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना लवकर आराम पडावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. राज्य पोलिस दल, महामार्ग पोलिस, आयएनएस शिवाजी, अग्निशमन दल अशा सर्व यंत्रणा घटनास्थळी असून आता आग आटोक्यात आली आहे. एका बाजूने वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून, दुसराही मार्ग लवकरच सुरू होईल. राज्य सरकार स्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहे.”

केमिकल घेऊन भरधाव वेगात निघालेल्या टँकरच्या चालकाचा ताबा सुटला, यामुळं टँकर स्लिप झाला, या अपघाताने टँकर रस्त्यावर आडवा झाला. मग त्यातील केमिकल रस्त्यावर पसरले, खालून जाणाऱ्या मार्गावर ही केमिकल पसरले. त्यानंतर टँकरला आग लागली. खालील मार्गावर काम करणाऱ्या चार व्यक्तींवर हे केमिकल पडले आणि तेही या आगीत होरपळले. या आगीत 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये