ताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

‘बिग बॉस 16’ माझा भाऊच जिंकणार; शिवच्या बहिणीचा आत्मविश्वास येणार कामी?

नवी दिल्ली : (Shiv Thakare On Bigg Boss 16) ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) हा लोकप्रिय कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला असून या पर्वात कोण बाजी मारणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. या पर्वात ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss) दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे (Shiv Thakare) बाजी मारू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, शिव ठाकरेच्या लाडक्या बहिणीने म्हणजेच मनिषा ठाकरेने (Manisha Thakare) आपला विश्वास व्यक्त केला आहे. शिवची बहिण म्हणाली,”बिग बॉस 16′ 100% माझा भाऊच जिंकणार”. शिवची बहिण म्हणाली,”बिग बॉस 16′ लवकरच संपणार आहे. मराठी ‘बिग बॉस’ शिवने गाजवलं आहे. ‘बिग बॉस’चा खेळ कसा खेळायचा हे शिवला कळलं आहे. त्यानुसार तो खेळत आहे. त्याची खेळी चाहत्यांच्याही पसंतीस उतरत आहे. टॉप तीन स्पर्धकांमध्ये शिवचं नाव घेतलं जातयं याचं नक्कीच कौतुक आहे. एक बहिण म्हणून मला शिवचा खूप अभिमान वाटतो”.

शिवची बहिण मनिषा पुढे म्हणाली,”लहानपणासूनच हिंदी ‘बिग बॉस’मध्ये जाण्याची शिवची इच्छा होती. गेल्या काही दिवसांपासून तो त्या दृष्टीने प्रयत्न करत होता. प्रत्येक ‘बिग बॉस’च्या दरम्यान त्याने घरात ठिक-ठिकाणी लिहिलं आहे,’बिग बॉस 14’चा विजेता शिव ठाकरे, ‘बिग बॉस 15’चा विजेता शिव ठाकरे, ‘बिग बॉस 16’चा विजेता शिव ठाकरे. हिंदी ‘बिग बॉस’मध्ये जाण्याची शिवची खूप इच्छा होती. त्यामुळे ‘बिग बॉस 16’साठी त्याला विचारणा झाल्यानंतर तो खूपच आनंदी झाला. त्यावेळी मालाडच्या त्याच्या फ्लॅटपासून ते दादरच्या सिद्धीविनायकापर्यंत तो पायी गेला होता”.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये