देश - विदेश

भविष्यातील शिक्षण आणि शिक्षणाचे भविष्य

आयुष्यभर शिकण्याची वृत्ती असणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे यासाठी लागणारे कौशल्य देखील जलदगतीने शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनाही आत्मसात करावे लागतील.

महामारीच्या सर्वांत आव्हानात्मक काळानंतर आता सर्व विद्यार्थी आणि शिक्षक पुन्हा आपल्या वर्गांमध्ये एकत्र आले आहेत. मात्र महामारीच्या या दोन वर्षात बरेच काही बदलले. या काळात शिक्षण ज्या पद्धतीने दिले जात होते, तेच बदलावे लागले आणि भविष्यातही अनेक बदल दिसून येणार आहेत. शिक्षणाबद्दल ठळकपणे दिसून येणारे कल हे भविष्यातील शिक्षणाला आकार देणारे ठरणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर हा वाढतच जाणार आहे. वास्तविक वर्गांबरोबरच ऑनलाईन पध्दती देखील चालूच राहणार आहेत,याला आजकाल हायब्रिड लर्निंग असे म्हणतात. तंत्रज्ञान हे फक्त शिक्षणाला चालना देण्यासाठी नसून शिक्षणाचा एक अविभाज्य घटक झाला आहे.

शिक्षणाचा मूळ हेतू हा केवळ चांगले गुण मिळवून आपले करिअर करणे नव्हे तर जगातील वास्तविक आव्हानांवर किंवा प्रश्‍नांवर इतरांबरोबर सहकार्याने उपाय शोधून काढणे याकडे आता प्रामुख्याने लक्ष दिले जात आहे. त्यासाठी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती असणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे यासाठी लागणारे कौशल्य देखील जलदगतीने शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनाही आत्मसात करावे लागतील.

त्यामध्ये ड्रोन, ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी, व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी अशा अनेक नवीन तंत्रज्ञानाचा समावेश असेल. शिक्षकांच्या दृष्टीने देखील येणार्‍या काळात अनेक बदल गरजेचे ठरतील. शिक्षकांना त्यांच्या विषयाच्या अभ्यासाबरोबरच संशोधक, विश्‍लेषक, सहयोगी, समस्या सोडविण्याची वृत्ती जोपासावी लागेल. एकंदरच या शतकातील झपाट्याने होणारे बदल, वाढणार्‍या मागण्या, तंत्रज्ञान आणि नवी धोरणे शिक्षण प्रणालीला आकार देणारी ठरतील.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये