भारतीय गोलंदाजांचा कहर! वादळी सुरुवातीनंतर, 269 धावांवर कांगारु गारद

चेन्नई : (India vs Australia 3rd ODI Live Cricket Score) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे मालिकेतील तिसरा सामना आज चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या जात आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना धू धू धूतलं. त्यांनी ‘पाॅवर प्ले’मध्ये 10 षटकात बिनबाद 61 धावा केल्या. त्यानंतर हार्दिक पांड्याने 11व्या षटकातील पाचव्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्याने 11व्या षटकातील पाचव्या चेंडूवर ट्रॅव्हिस हेडला 33 धावांवर बाद केलं.
त्याने मिचेल मार्शसोबत पहिल्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाने 12 षटकात एका विकेटवर 74 धावा केल्या आहेत. हार्दिक पांड्यानेही ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. 15व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने मिचेल मार्शला 47 धावांवर क्लीन बोल्ड केलं.
हार्दिक आणि कुलदीप यांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले तर अक्षर पटेल आणि सिराज यांनी 2-2 बळी घेतले आहेत. भारतीय गोलंदाजांनी धुमाकुळ घालत ऑस्ट्रेलियाची 49 षटकांत 269 धावांवर सर्वबाद अशी स्थिती करून सोडली.