‘महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार यांच्या डोळ्यात खुपतं…’- संजय राऊत

मुंबई : राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी पाच महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीचे ज्येष्ठे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील सिल्वर ओक या निवास्थानाबाहेर त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनावर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी हे आंदेलन दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. तसंच हा अत्यंत चिंता वाटावी असा प्रकार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
एसटी संपाच्या बाबतीत सरकारने मार्ग काढण्यासाठी, तसेच मागण्या मान्य करण्यासाठी सर्व उपाययोजना आणि चर्चा केलेल्या आहेत. तसेच न्यायालयाचा निर्णदेखील त्याच पद्धतीचा असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. याशिवाय आंदोलक कर्मचाऱ्यांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य झाल्याचेही आपल्याला वाटते. तरीही कुठली तरी अन्यात शक्ती पडद्यामागून वातावरण बिघडवण्याचं आणि एका विशिष्ट गटाची डोकी भडकवतं यासाठी सातत्याने हालचाली करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार यांच्या डोळ्यात खुपतं आणि ज्यामुळं ज्यांच्या पोटात दुखतं असे काही लोकं अशा प्रकारचे कृत्य घडवू पाहत असल्याचं राऊत म्हणाले.