ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला तर उपमुख्यमंत्री उत्तर देतात”; आदित्य ठाकरेंनी दिला ‘हा’ इशारा

मुंबई : (Aaditya Thackeray On Eknath Shinde) आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. सभागृहात प्रश्न विचारल्यानंतर योग्य प्रकारे उत्तर मिळत नाहीत, अशी तक्रार करत त्यांनी मुख्यमंत्र्यांना थेट इशाराच दिला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही सभागृहात मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला तर त्यांनीच त्याचं उत्तर देण्याऐवजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देण्यासाठी जागेवरुन उठले. जर मुख्यमंत्र्यांनी आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करु, असा थेट इशाराही यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. तसंही त्यांना माहितीए की त्यांचं सरकार हे घटनाविरोधी सरकार आहे आणि हे सरकार नक्कीच पडणार आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

पुढे बोलताना ते म्हणाले, हे बिल्डर आणि कंत्राटदारांचं सरकार आहे, लोकांचं नाही. २६३ कोटींची योजना असून त्याविरोधात सीपीडी विभागानं निविदा काढल्या आहेत. मुंबई महापालिका सध्या मुख्यमंत्री कार्यालयाद्वारे चालवली जात आहे. हे सरकार अनेक घोटाळे करत आहे, हे घोटाळे लोकांसमोर आले पाहिजेत, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान, 3 ते 6 महिन्यांत आम्ही बीएमसीचे विविध घोटाळे बाहेर काढले आहे. आता सरकारचा आणखी एक घोटाळा आम्ही समोर आणत आहोत. आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ते देत नाहीत, निवडणूक घेण्याची हिंमत नाही, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकावर निशाणा साधला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये