देश - विदेश

रशियाशी युती तर; किंमत चुकवा…;अमेरिकेची भारताला धमकी

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून जग तिसर्‍या युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे, असे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच या युद्धात भारताने रशियाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे अमेरिकेची मोठी निराशा झाली आहे. भारताच्या या भूमिकेवर अमेरिकेने वारंवार दबाव आणूनदेखील भारताने आपली तटस्थ भूमिका बदलली नाही आहे. त्यामुळे अखेर अमेरिका चक्क आता भारताला धमकी देण्यावर उतरली आहे.

नवी दिल्ली : भारताने रशियाशी युती केली, तर भविष्यात त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, अशी तंबी अमेरिकेने भारताला दिली आहे. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन (व्हाईट हाऊस नॅशनल इकॉनॉमिक कौन्सिलचे संचालक) यांचे सर्वोच्च आर्थिक सल्लागार ब्रायन डीझ यांनी म्हटले आहे की, अमेरिकन प्रशासनाने भारताला रशियाशी संबंध न ठेवण्याचा इशारा दिला आहे.

युक्रेन-रशिया युद्धावर भारताच्या काही प्रतिक्रियांमुळे अमेरिका निराश झाल्याचे ते म्हणाले. ख्रिश्चन सायन्स मॉनिटर या आंतरराष्ट्रीय वृत्त वेबसाइटने बुधवारी आयोजिलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी अमेरिका युद्धाच्या संदर्भात असे अनेक प्रसंग आले आहेत, जिथे चीन आणि भारत या दोन्ही देशांच्या निर्णयांमुळे आम्ही निराश झालो आहोत, असे डीज यांनी सांगितले. त्याशिवाय भारताने रशियासोबतची राजकीय भागीदारी वाढवली तर, त्याचे दीर्घकालीन परिणाम भारताला भोगावे लागतील, असे अमेरिकेने भारताला सांगितले असल्याचे ते म्हणाले.

युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाबाबत अमेरिका, युरोपीय देश, ऑस्ट्रेलिया आणि जपान आदी देशांनी रशियावर तीव्र शब्दांत टीका करत मोठ्या प्रमाणात आर्थिक निर्बंध लादले आहेत. तर, दुसरीकडे भारताने रशियाने केलेल्या हल्ल्यावर साधी टीकाही केलेली नाही. तसेच संयुक्त राष्ट्रांमध्ये रशियन हल्ल्याचा निषेध करणार्‍या ठरावांवर मतदान करण्यापासूनही भारताने स्वतःला दूर ठेवले आहे. हिंसाचार त्वरित संपला पाहिजे आणि दोन्ही बाजूंनी चर्चेच्या मार्गाने मतभेद सोडवले पाहिजेत, असे मत भारताने सातत्याने व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये