राष्ट्रवादी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी; शरद पवार

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, राष्ट्रवादी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे. परंतू चुकीच्या नेतृत्त्वाच्या पाठीशी नाही, असे देखील यावळी शरद पवार यांनी म्हटले आहे. नेता चुकीचा असेल तर, त्याचा परिणाम काय होतो, ते आज दिसंल आहे. गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर नाव न घेता पवार यांनी हल्लाबोल केला.
एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या सिल्व्हर येथिल आंदोलना नंतर शरद पवार म्हणाले की, टोकाची भूमिका घेण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. तसेच आपण आंदोलक कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहोत. मात्र, चुकीच्या नेतृत्त्वाच्या पाठीशी नाही. नेता चुकीचा असेल तर, त्याचा परिणाम काय होतो, ते आज दिसलं आहे असे देखील पवार म्हणाले.
कुणी चुकीचा रस्ता दाखवत असेल, तर त्या रस्त्याला विरोध करणे ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे, एवढचं मी सांगतो असे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. संकट आलं की आपण सर्व एक आहोत हेच तुम्ही दाखवले, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. पण चुकीच्या गोष्टीला समर्थन देवू नका असे पवार म्हणाले.