महाराष्ट्ररणधुमाळी

रोहित पवारांचा राज ठाकरेंना खोचक टोला म्हणाले…

पुणे : आज पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला .केवळ अंगावर भगवी शाल पांघरून बाळासाहेब ठाकरे होता येत नाही. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा नेता एकदाच होतो, तो पुन्हा घडत नाही अशा शब्दात टोला लगावला . ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे अंगावर शाल घ्यायचे त्याच्याप्रमाणे राज ठाकरे हि शाल अंगावर घेतात. पण लक्षात घ्या की, कुठलाही नेता पुन्हा घडत नसतो. पवार साहेब परत घडणार नाहीत, बाळासाहेब ठाकरे परत घडणार नाहीत, असे रोहित पवारांनी म्हंटलं .

तसेच राज ठाकरे ज्या पद्धतीने अंगावर शाल पांघरून घेतात त्यावरून हेच समजते कि ते बाळासाहेब ठाकरे यांची कॉपी करत आहेत. याचप्रमणारे राज ठाकरे उत्तम अभिनेते आहेत, ते चांगला अभिनय करतात . त्यांच्या भाषणाची स्क्रिप्ट ही भाजपने लिहून दिली होती. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नरेटिव्ह सेट केले जात आहे असंही रोहित पवार म्हणाले.

राज ठाकरे यांनी ठाण्यात झालेल्या उत्तर सभेतही राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. शरद पवार यांनी जातीपातीचं राजकारण केलं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच राज्यात जातीयवाद वाढल्याचा गंभीर आरोप त्यांनी त्यावेळी केला . राज ठाकरेंच्या आरोपांना खुद्द शरद पवार यांनीही प्रत्युत्तर दिलं. पण आता रोहित पवार यांनी राज ठाकरे यांना जोरदार टोला लगावलाय. रोहित पवार यांच्या टीकेला आता मनसेच्याकडून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार हे पाहणे रंजक ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये