महाराष्ट्ररणधुमाळी

वीस वर्षानंतर जेम्स लेन आत्ताच कसे समोर आले? जितेंद्र आव्हाडांचा सवाल

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त लिखाण करणारे अमेरिकन इतिहासकार आणि लेखक जेम्स लेन यानी एका प्रसिद्ध माध्याम समुहाला दिलेल्या मुलाखतीवरुन महाराष्ट्रात पुन्हा एकदा चर्चेला तोंड फुटलं आहे. यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देताना काही सवाल उपस्थित केले आहेत. जेम्स लेन गेल्या वीस वर्षांपासून गायब होते ते आत्ताच कसे समोर आले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

माध्यमांशी बोलातना आव्हाड म्हणाले, वीस वर्षानंतर जेम्स लेन आत्ताच कसा समोर आले? भांडारकर संस्थेवर हल्ला झाला तेव्हा आणि बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ दिला तेव्हा हा लेखक का समोर आला नाही? आत्ताच ते कसे समोर आले? वीस वर्षे ते कुठे गायब होते यावर मला काहीच म्हणायचं नाही. पण त्यांनी आपल्या पुस्तकातून वादग्रस्त उल्लेखाचं पान काढून टाकावं, अशी मागणी लेनची मुलाखत घेणाऱ्या पत्रकारानं करावी. असे यावेळी आव्हाड म्हणाले.

दरम्यान आज झालेल्या राज ठाकरे यांच्या पुणे येथिल पञकार परिषदेत एका जुन्या पञामुळे वाद खुपच चिघळला आहे. छत्रपती शिवरायांबाबत जेम्स लेन यांनी लिहिलेल्या पुस्तकासाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी माहिती पुरवल्याच्या आरोपावरून राज्याचं राजकारण पुन्हा ढवळून निघालं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये