शरद पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार विरोधात; फडणवीसांचा घणाघात

मुंबई : आज देशभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. याच दिनाचं औचित्य साधून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १४ ट्वीट करत शरद पवारांना धारेवर धरलं आहे. पवार आंबेडकरांच्या विचारांच्या विरोधात असल्याचा गंभिर आरोप त्यांनी यावेळेस लगावला आहे.
ट्वीट करताना फडणवीस म्हणाले की, एकीकडे आपण आंबेडकर जयंती साजरी करत आहोत. ज्यांचा जन्मू काश्मिरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० च्या समावेशाला विरोध होता. मात्र आता त्यांचे विचार अन् मूल्यांच्या विरोधात काय बोलले जात आहे, असं सांगत फडणवीस यांनी पवारांनी कलम ३७० हटविण्याच्या निर्णय विरोधी भूमीकेवर टीका केली आहे.
तसेच पवारांची ही भूमीका समाजाच्या एकोप्यात बाधा आणणारी आहे. आंबेडकरांच्या भारतात ही भूमिका कदापीही स्विकारली जाणार नाही, असं म्हणत त्यांनी पवारांना डिवचलं आहे. जातीयवादाचं राजकारण करण ही राष्ट्रवादीची जुनी खोड आहे. केवळ आंबेडकरांच्या विचारांना विरोध करण्याचा त्यांचा हेतू असल्याचंही फडणवीस यावेळेस म्हटलं आहे.