क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांच्या अडचणींत वाढ; आर्म ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल,

मुंबई : (Devendra Fadnavis On Sada Sarvankar) गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील प्रभादेवी परिसरात शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने आले होते. दोन्ही गटात राडा झाल्यानंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. यावेळी दादर पोलीस ठाण्यात सदा सरवणकर यांच्या बंदुकीतून गोळी झाडण्यात आली होती. याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर, त्यांचा मुलगा समाधान सरवणकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी आता सदा सरवणकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सदा सरवणकर यांच्याविरोधात आता आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांचा बंदुकीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, याबाबतची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वत: दिली. ते अधिवेशनात बोलत होते.

सदा सरवणकर गोळीबार प्रकरणी माहिती देताना देवेंद्र फडणवीस अधिवेशनात म्हणाले, “लोकप्रतिनिधी आणि खासगी लोकांनी केलेल्या गोळीबाराचा विषय आपण मांडला होता. ज्यामध्ये आपण सदा सरवणकरांचाही विषय मांडला. या नमूद गुन्ह्यामध्ये १४ साक्षीदार तपासले. त्यानंतर सदा सरवणकर, त्यांचा मुलगा समाधान सरवणकर यांच्यासह एकूण ११ आरोपींविरोधात कलम (४१) (अ) (१) नुसार नोटीस देण्यात आली आहे.”

“त्याचबरोबर, सदा सरवणकर यांनी आपली परवानाधारक बंदूक स्वत:जवळ बाळगणं आवश्यक असताना त्यांनी बंदूक गाडीत ठेवली. त्यामुळे आर्म अॅक्ट १९५९ च्या कलम ३० अन्वये त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांनी परवानासंदर्भातील नियमांचं उल्लंघन केल्याने त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे,” अशी माहिती फडणवीसांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये