श्रीदेवी लग्नाआधी प्रेग्नेंट होत्या? बोनी कपूर यांचा जान्हवीशी संबंधित मोठा खुलासा
Boney Kapoor on Sridevi : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अचानक निधनानंतर बॉलिवूडसह अख्खा जगाला हादरा बसला होता. दुबईमध्ये कुटुंबातील सदस्याच्या लग्नासाठी गेलेले श्रीदेवी भारतात परतलीच नाही. गेल्या पाच वर्षांपासून श्रीदेवी यांच्या मृत्यू नेमका कसा झाला. हा घातपात होता की निसर्गरित्या मृत्यू होता याबद्दल तर्क वितर्क लावली जात होती. पण आज खुद्द श्रीदेवी यांचे पती आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांनी खुलासा केला आहे. त्यांनी त्या रात्री काय झालं आणि श्रीदेवी यांच्या मृत्यू कशामुळे झाला याबद्दल सांगितलं आहे.
श्रीदेवीचा मृत्यू हा क्रॅश डाएटमुळे झाल्याचा गौप्यस्फोट बोनी कपूरने केला आहे. एवढंच नाही तर त्यांनी या मुलाखतीत श्रीदेवी आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक खुलासे केले आहेत. बॉलिवूड जगतात कायम ही चर्चा होते की श्रीदेवी या लग्नापूर्वी प्रेग्नेंट होत्या. या अफवेवर अखेर बोनी कपूर यांनी चुपी तोडली आहे. जान्हवी कपूर हिच्याबद्दलचा मोठा खुलासा वडील बोनी कपूर यांनी केला आहे.
त्यांनी या मुलाखतीत सांगितलं की, लोकांना वाटतं श्रीदेवी लग्नाआधीच प्रेग्नेंट होत्या. खरंतर आम्ही दोघांनी लग्न केलं होतं आणि नंतर लग्नाबद्दल जाहीर केलं. तोपर्यंत श्रीदेवी गर्भवती असल्याचं दिसत होत्या. या मुलाखतीत बोनी कपूर यांनी दुसऱ्या लग्नाबद्दलही सांगितलं. ते म्हणाले की, माझं दुसरं लग्न हे श्रीदेवीसोबत शिर्डीत 2 जूनला झालं होतं. तिथे आम्ही एक रात्रही राहिलो होतो. त्यानंतर जानेवारी महिन्यात श्रीदेवी प्रेग्नेंट असल्याचं दिसून आली. मग आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. म्हणून आम्ही सर्वांसमोर लग्न केलं.