ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्र

सरकारनी ठरवलं तर.. ‘ईडी’ संदर्भात प्रसादची पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय..

Prasad Oak Share Instagram Reels : सध्या सरकारी यंत्रणांचा बडगा कुणाच्या खांद्यावर कधी येईल हे काही सांगता येत नाही. अगदी गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत लहान मुलांनाही इन्कम टॅक्स , ईडी हे शब्द माहीत झाले आहेत. गेल्या काही वर्षात या केंद्रीय संस्थांनी देशाचे राजकारण ढवळून निघाले आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक सध्या भलताच चर्चेत आहेत. ‘चंद्रमुखी’ आणि ‘धर्मवीर’ असे दोन सिनेमे त्याने लागोपाठ दिले. एका चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले तर एका चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका बजावली..

प्रसाद सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. कधी रील्स शेयर करत असतो तर कधी मनातल्या गोष्टी.. आज तर त्याने चक्क ईडी विषयी भाष्य केले आहे. पण हा व्हिडिओ काहीसा वेगळा आहे, यामध्ये त्याने टीका करण्या ऐवजी एका गाण्यात गमतीशीरपणे तो व्यक्त झाला आहे. एका जुन्या गाण्याचा जोरदार वापर सुरू आहे. ‘कमाता हू बहोत कुछ पर.. कमाई डूब जाती है.. कुछ इन्कम टॅक्स ले जाता है.. कुछ ईडी उडाती है ‘ असे या गाण्याचे बोल आहेत. त्यामुळे प्रसादलाही या गाण्यावर रील करण्याचा मोह आवरला नाही.

पण यात गंमत म्हणजे प्रसाद नाचता नाचता बायकोकडे जातो.. आणि शेवटी मंजिरीकडे हात करत म्हणतो.. ‘कुछ ईडी उडाती है..’ याशिवाय त्याने या रीलला एक कॅप्शनही दिले आहे. ”सरकारनी ठरवलं तर.. टॅक्स कंट्रोल होऊ शकतो… पण बायको????????” असे प्रसाद गंमतीने म्हणाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये