आरोग्यदेश - विदेश

सावधान भारतात कोविड रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; एका दिवसात वाढले इतके रुग्ण…

नवी दिल्ली : भारतात गेल्या चोवीस तासात १,१५० नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळं देशातील अॅक्टीव कोरोना रुग्णांची संख्या ११,५५८ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं रविवारी ही माहिती दिली. कोरोनानं पुन्हा डोकं वर काढल्यानं नागरिकांची चिंता वाढवणारी बाब समोर आली आहे.

तर आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासात चार कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळं कोरोनाच्या एकूण मृत्यूंची संख्या ५,२१,७५१ वर पोहोचली आहे. कालच काही प्रमाणात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली. वाढत्या आकडेनुसार ही रुग्णवाढ १७ टक्के आहे. गेल्या चोवीस तासात कालपेक्षा आज १७५ अधिक रुग्णांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर कोरोनाचा पॉझिटिव्ही रेट हा ०.३१ टक्के झाला आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्ह दर ०.२७ टक्के नोंदवला गेला आहे.

दरम्यान, देशात आत्तापर्यंत १८६.५१ कोटी कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहिम राबवण्यात आल्यानं देशात कोरोनाच्या संसर्गाची परिस्थिती नियंत्रण आली आहे. पण आता पुन्हा कोरोनाने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये