ताज्या बातम्यारणधुमाळी

सोमैया बाप बेटे फरार है… संजय राऊतांचा सोमय्या पिता- पुत्रांवर निशाणा

मुंबई : मुंबई पोलिसांनी भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना समन्स बजावले होते. सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमेच्या नावाखाली गोळा केलेल्या वर्गणीचे पैसे लाटण्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर त्यासंदर्भात चौकशीसाठी हे समन्स बजावण्यात आलं होतं. ट्रॉम्बे पोलीस स्टेशनने समन्स बजावल्यानंतरही किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या पोलीस स्थानकात हजर राहिले नाहीत. यावरून संजय राऊत यांनी सोमय्या पिता-पुत्रांवर निशाणा साधला आहे.

“सोमैया बाप बेटे फरार है. ये दोनो मिल्खा सिंग से तेज भाग रहे हैं. Ok. भाग सोमैया भाग!!” असं ट्वीट करत संजय राऊतांनी सोमय्या पिता-पुत्रांना टोला लगावला आहे.

दरम्यान, या प्रकरणात अटकेची शक्यता असल्याने सोमय्या पिता-पुत्र दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या याचिकेवर ११ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. त्यांचे वकील, अधिवक्ता हृषिकेश मुंदरगी यांनी सांगितले की ते अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत आहेत. किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलावर लावण्यात आलेले आरोप फालतू आणि बिनबुडाचे आहेत, असं त्यांच्या वकिलांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये