हिना रब्बानी खार असं काय म्हणाल्या, “पंतप्रधान मोदींमुळे पाकिस्तानचे स्वप्न…;”

Pakistan Hina Rabbani On Indo-Pak Relation: आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांचे सरकार आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून 6.5 दशलक्ष डॉलर्सचे बेलआउट पॅकेज (Pakistan Latest News) मिळावं म्हणून सातत्याने प्रयत्नशील आहेत, पंण त्यांच्या या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही. यावर आता पाकिस्तानेच्या परराष्ट्र सचिव हिना रब्बानी खार यांनी एक वक्तव्य केलंय. पाकिस्तानला भारतासोबत व्यापार करायचा आहे, पण नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत ते शक्य नाही असं त्या म्हणाल्या.
पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिव हिना रब्बानी खार (Hina Rabbani Latest News) यांनी अमेरिकन वेबसाइट पॉलिटिकोला मुलाखत देताना सांगितले की, आम्ही भारतासोबत व्यापार पुन्हा सुरू करण्याचे स्वागत करू,पण पंतप्रधान नरेंद्र मोदी तसे करण्याची शक्यता नाही. भारताच्या वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते डिसेंबर 2022 दरम्यान भारत-पाकिस्तानचा व्यापार 1.35 अब्ज डॉलर्स इतका होता. तर पाकिस्तानचा सर्वात जवळचा मित्र असलेल्या चीनसोबतचा भारताचा व्यापार 87 दशलक्ष डॉलर्स इतका होता.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली असून पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर उभा आहे. त्यामुळे पाकिस्तान आता आंतरराष्ट्रीय मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे.