देश - विदेश
‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मालिकेतील ही अभिनेत्री खरंच विकते मसाले

मुंबई, 23 नोव्हेंबर- काही दिवसांपूर्वी झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका प्रसिद्ध होती. त्यातली नायिका राधिका मसाले नावाने उद्योग सुरू करते आणि नवऱ्यापेक्षा श्रीमंत होते, असं दाखवण्यात आलं होतं. राधिकाचं काम करणाऱ्या अनिता दातेला मसाले विकून मोठी उद्योजिका झालेली दाखवल्याने काही काळ ट्रोलही करण्यात आलं होतं. पण झी वर नव्याने सुरू झालेल्या ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ (Marathi serial tuzya mazya sansarala ani kay hava) या मालिकेत झळकलेली एक अभिनेत्री खऱ्या आय़ुष्यात खरंच एक यशस्वी उद्योजिका आहे आणि तेही मसाले विकून उद्योजिका झालेली आहे.