पालिकेसाठी सॉफ्टवेअर होणार डिटेक्टिव्ह

पुणे : शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, भवन, ड्रेनेजसह सर्व अभियांत्रिकी कामांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ‘इंटिग्रेटेड वर्क मॅनेजमेंट सिस्टीम’ सॉफ्टवेअरचा वापर करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ऑनलाईन बिले सादर होऊन ठेकेदारांना वेळेत कामांचे पैसे मिळतील, असा दावा महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी केला आहे.

एखाद्या रस्त्याचे काम पूर्वी केले असले तरी वर्षभराने त्याच रस्त्याच्या कामासाठी निविदा मागविल्या जातात. हे करीत असताना संबंधित रस्त्यांच्या नावात बदल केले जात असल्याने लगेच लक्षात येत नाही. रस्ते, पदपथ, ड्रेनेजलाईन, विद्युत खांब अशा कामांमध्ये क्षेत्रीय कार्यालयस्तरावर अथवा मुख्य खात्याकडूनही कामांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता अधिक असते. बदलणारी वॉर्डरचना अधिकार्‍यांच्या बदल्या आणि मागील रेकॉर्ड शोधण्यासाठी लागणारा कालावधी यामुळे या चुका होत असतात. महापालिकेकडून दरवर्षी हजारो कामांच्या निविदा काढल्या जात असल्याने या त्रुटी राहतात. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली सीएसआरच्या माध्यमातून जीआयएस बेस्ड ‘इंटिग्रेटेड वर्क मॅनेजमेंट सिस्टीम’ हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. यामध्ये विभागवार मागील कामांच्या नोंदी अपलोड करण्याचे काम
सुरू आहे.

admin: