बापरे भारताची गरीबी घटली?

नवी दिल्ली : जागतिक बँकेच्या पॉलिसी रिसर्चच्या वर्किंग पेपरनुसार 2011 च्या तुलनेत 2019 मध्ये भारतातील दारिद्र्यीचे प्रमाणात 12.3 टक्क्यांनी घट झाल्याचे सांगितले जात आहे. देशातील गरिबीचा आकडा 2011 मध्ये 22.5% वरून 2019 मध्ये 10.2% वर आला आहे. यावरुन देशातील गरीबीचे प्रमाण 12.3 टक्कयांनी घट झाली आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील गरिबीत तुलनेने मोठी घट झाली आहे. अशी माहिती जागतिक बँकेच्या पॉलिसी रिसर्चच्या वर्किंग पेपरमध्ये देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) ने प्रकाशित केलेल्या वर्किंग पेपरमध्ये असेही म्हटले आहे की, भारतातील अत्यंत दारिद्र्या प्रमाण जवळजवळ संपवल्यात जमा आहे.

शहरी भारताच्या तुलनेत ग्रामीण भागातील दारिद्र्य कमी झाले आहे. ग्रामीण भागातील गरिबीचे मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे. 2011-2019 या कालावधीत ग्रामीण आणि शहरी गरिबीत 14.7 आणि 7.9 टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या दशकभरात भारतातील गरिबी कमी झाली आहे, पण पूर्वी विचार केला होता तितकी नाही, असे देखील यामध्ये सांगण्यात आले आहे. अर्थशास्त्रज्ञ सुतीर्थ सिन्हा रॉय आणि रॉय व्हॅन डेर वेड यांनी संयुक्तपणे हा पेपर लिहीला आहे. जागतिक बँकेच्या पॉलिसी रिसर्च पेपर्सचा उद्देश विकासावरील विचारांच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणे आणि संशोधन परिणामांचा त्वरीत प्रसार करणे हा त्यांचा हेतु आहे. त्यामुळे देश प्रगतीपथावर आहे असे त्यांचे मत आहे.

Prakash Harale: