भाजप पुन्हा राजकीय भूकंप करणार; पाटलांच्या विधानानं शिंदे गटाचे वाढलं टेन्शन!

औरंगाबाद : (Jayant Patil On Eknath Shinde) तीन महिन्यापुर्वी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली. त्यानंतर भाजपला सोबत घेत शिंदे-फडणवीसांनी राज्यात सत्ता स्थापने केली. अनेकांकडून हे सरकार संविधानिक नसल्याची टीका केली आहे. या सर्व आरोपप्रत्यारोपांमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सध्याच्या सरकारबाबत काही भविष्यवाणी केली आहे.

जयंत पाटील औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले, हे सरकार कार्यकाळ पूर्ण करणार नसून, भाजपचं उदिष्ट साध्य झाले की, ते सरकार पाडतील आणि त्यानंतर शिंदे यांना चूक झाल्याचं कळेल. मुख्यमंत्री शिंदे भाषण लिहून दिल्यावरच बोललात, वाचून दाखवतात ते भाषण गुलामगिरीमध्ये असल्याचा आरोप देखील पाटील यांनी केला आहे. शिंदे जसे काम करताय त्यावर निश्चितपणे फडणवीस नाराज आहेत आणि त्यांनी सावधसुद्धा राहावे असा सल्ला त्यांनी फडणवीसांना दिला आहे.

दरम्यान, येत्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, महापालिकेच्या निवडणुका काँग्रेस, शिवसेनेसोबत आघाडी करण्याबाबतही पाटील यांनी विधान केले आहे. ते म्हणाले की, स्थानिक नेत्यांना इतर पक्षातील स्थानिक नेत्यांशी चर्चा करण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्याशी काही जुळले तरच काही विचार होऊ शकतो, असे सूचक विधान पाटील यांनी केले आहे.

Prakash Harale: