देशातील बहुतांशी भागातून नैऋत्य मान्सूनने माघार घेतली आहे. दरम्यान पश्चिम बंगालच्या उसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. याचा प्रभाव भारतीय दक्षिण द्विपकल्पीय प्रदेशातील राज्यांवर होत आहे. दरम्यान राज्यातील काही भागात देखील पुढील २४ तासांतमध्य ते मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख डॉ.के. एस. होसाळीकर यांनी एक्स पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, पुढील २४ तासांत दक्षिण कोकणातील काही भाग, मध्य महाराष्ट्र, गोवा आणि उत्तर कर्नाटक प्रदेशात एकाकी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने सूचित केली आहे.
पुढील ७ दिवस असा असेल हवामान अंदाज
पुढील ४ ते ५ दिवसांत दक्षिण द्वीपकल्पीय भारताच्या काही भागांमध्ये पृथक् मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. पुढील आठवडाभरात देशाच्या उर्वरित भागात पावसाची कोणतीही लक्षणीय शक्यता आहे.२२ ऑक्टोबरच्या सुमारास मध्य बंगालच्या उपसागरावर नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.