शरद पवारांच्या मुंबईमधील ‘सिल्वर ओक’ निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन

मुंबई : राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी पाच महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीचे ज्येष्ठे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील सिल्वर ओक या निवास्थानाबाहेर त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे.

आज शरद पवार यांच्या निवास्थानाच्या आवारात आक्रमकम झालेले कर्मचारी अचानकपणे शिरले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दगडफेक आणि चप्पलफेक केली. शिवाय, शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारविरोधता जोरदार घोषणाबाजी केली. या ठिकाणी मोजकाच पोलीस बंदोबस्त असल्याने आणि आंदोलक कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याने बराच गोंधळ देखील उडाला आहे.

हे चोरांचं सरकार, इथले वयोवृद्ध पुढारी शरद पवार हे आज एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांसाठी जबाबदार आहेत. यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. हे चोरांचं सरकार आहे, आमच्यावर अन्याय होतोय हे दिसत नाही का? महाराष्ट्राच्या जडणघडणीत आमचाही वाटा आहे. असं आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे.

Sumitra nalawade: