मुंबई : मनसे आणि शिवसेना नेत्याने एकापाठोपाठ केलेल्या आयोध्या दौऱ्यांची घोषणा केली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. यावर आता माध्यमासमोर राजकीय प्रतिक्रीया उमटायला सुरुवात झाली आहे. काहीच वेळापुर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना फ्रस्टेटेड व्यक्ती असं संबोधलं आहे. ते म्हणाले, आयोध्याचा दौरा कोणीही करावा आमची काही हरकत नाही. प्रभू श्रीराम आपले सर्वांचे दैवत आहे. त्यामुळं कुठल्याही व्यक्तीला तिथं जावंस वाटण्यात काहीही गैर नाही. तिथलं भव्य मंदिर पाहण्याची इच्छा प्रत्येकाची असु शकते, हे स्वाभाविक आहे.
मनसे आणि भाजप एकत्र येण्याच्या दृष्टीनं ही तयारी आहे का? या पत्रकारांच्या प्रश्नावर आपल्याला असं वाटत नाही, असं म्हटलं. याची कुठलाही राजकीय अन्वयार्थ लावण्याची गरज नाही. भाजपची स्वतःची एक भूमिका असते आमच्या भुमिकेवर आम्ही चालत असतो, असंही फडणवीस यावेळी म्हणाले. भाजपं राज्यात दंगली भडकवण्याचा कट रचत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकताच केला होता. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, दिवसभरात काहीही बोलत असतात त्यामुळं त्यांच्या विधानांवर किती वेळा उत्तर द्यायची? असं फडणवीस यावेळी म्हणाले.