पुरस्कार मोदींना भुर्दंड महापालिकेला! पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याची कोट्यावधी रुपयांची बिले आली समोर
पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 1 ऑगस्ट 2023 रोजी पुणे (Pune News) दौऱ्यावर आले होते. त्यावेळी एस. पी. कॉलेजच्या मैदानावर त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले होते, तसेच शिवाजीनगर येथील पोलिस परेड ग्राउंड येथे पुणे महापालिका, पीएमआरडीएपिंपरी चिंचवड महापालिका (PCMC) आणि पुणे मेट्रो (Pune Metro) यांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले होते. यावेळी मंडपासाठी व बैठक व्यवस्थेसाठी 1 कोटी 85 लाख 1 हजार 469 रुपयांचा खर्च महापालिकेच्या (PMC) तिजोरीतून केला जाणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समिती समोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता.
जर्मन हँगर पद्धतीचा मांडव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम ऐन पावसाळ्यात असल्याने गैरसोय होऊ नये यासाठी बंदिस्त जर्मन हँगर पद्धतीचा मांडव उभारण्यात आला होता. हा मांडव आग व पाणी विरोधक कापड वापरून उभारण्यात आला होता. तसेच या कार्यक्रमाच्या काही दिवस आधीच ‘जी-२०’ परिषदेसाठी मांडव टाकणे इव्हेंट मॅनेजमेंट करणे यासाठी जो ठेकेदार नियुक्त केला होता. त्यांच्याकडूनच ही कामे तातडीने करून घेण्यात आली आहेत, असे प्रस्तावात नमूद केले आहे.