आरोग्यइतरताज्या बातम्यामहाराष्ट्र

धक्कादायक! नांदेड पाठोपाठ घाटी रूग्णालयातही मृत्यूचं तांडव; 24 तासात 10 रूग्णांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर | Ghati Hospital – नांदेडमध्ये झालेल्या धक्कादायक घटनेनंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) देखील मोठी घटना घडली आहे. नांदेडमधील रूग्णालयाप्रमाणेच छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रूग्णालयातही (Ghati Hospital) रूग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. घाटी रूग्णालयात 24 तासात 10 रूग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

नांदेडच्या शासकीय रूग्णालयाप्रमाणेच घाटी रूग्णालयातही हा प्रकार घडल्याने शासकीय रूग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. घाटी रूग्णालयात 24 तासात 10 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये 2 बालकांचा समावेश आहे. तसंच घाटी रूग्णालयात ज्या रूग्णांचा मृत्यू झाला आहे त्यांना बाहेरच्या रूग्णालयातून रेफर करण्यात आलं होतं, अशा माहिती देखील समोर येतीये.

दरम्यान, घाटी रूग्णालयामध्ये 15 दिवस पुरेल इतकाच औषधसाठा असल्याची माहिती समोर आली आहे. तर हाफकीनने औषधे खरेदी बंद केल्यामुळे राज्यात शासकीय रूग्णालयांमध्ये औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. तर रूग्णांना वेळेत औषधांचा पुरवठा होत नसल्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागत असल्याचा आरोप केला जात आहे. नांदेड रूग्णालयामध्ये देखील असाच प्रकार घडला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये