हिंगोलीत तब्बल १०,००० स्क्वेअर फुटातील राहुल गांधींच्या रांगोळीचं देशभरात कौतुक; पहा व्हिडीओ

हिंगोली : Bharat Jodo Yatra Rahul Gandhi Rangoli In Hingoli- राहुल गांधी भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात आहेत. सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळताना ते कायम दिसत आहेत. त्यांचे लहान मुले ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोक यांच्यासोबतचे अनेक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर त्यांचे मोठ्या थाटामाटात स्वागत होताना दिसत आहेत. दरम्यान, भारत जोडो यात्रा हिंगोलीमध्ये पोहोचल्यानंतर यात्रेच्या आणि राहुल गांधींच्या स्वागतासाठी राहुल गांधी यांचे चित्र असलेला भल्या मोठ्या रांगोळीचा नजराणा साकारण्यात आला आहे. (Rahul Gandhi Bharat Jodo Yatra Hingoli Maharashtra)
तब्बल १०,००० चौरस फुट एवढी मोठी रांगोळी हिंगोलीमध्ये साकारण्यात आली आहे. अशाप्रकारचे स्वागत यापूर्वी कोणत्याही कॉंग्रेस नेत्याचे झाले नसावे. ६ रांगोळी कलाकारांनी ४८ तासांत ही रांगोळी काढली आहे. तब्बल १२ टन रांगोळी यासाठी वापरण्यात आली असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. या रांगोळीची देशभरात कौतुक केलं जात आहे.
कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादीसारख्या मित्र पक्षांनी देखील या यात्रेत सहभाग नोंदवला आहे. स्थानिक लोक देखील मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होत आहेत.