ताज्या बातम्यापुणे

उमांगमलज जन्मोत्सवानिमित्त ‘दगडूशेठ’ बाप्पाला 1100 नारळांचा नैवेद्य

पुणे | गाणपत्य संप्रदायात कार्तिक शुद्ध चतुर्थी, श्री उमांगमलज जन्मोत्सवात मोरयाला नारळ समर्पित करण्याला विशेष महत्व आहे. अंत:करणातील अहंकार आणि ममत्वाचे मळभ दूर झाल्यानंतर शुद्ध, स्वच्छ, प्रशांत स्वरूपातील जे परमात्म दर्शन घडते, त्यांना म्हणतात उमांगमलज. त्यामुळेच दगडूशेठ गणपती मंदिरात (Dagadusheth Ganpati Temple) हा जन्मोत्सव सोहळा साजरा करीत श्रीं ना 1100 नारळांचा नैवेद्य दाखविण्यात आला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात श्री उमांगमलज जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नारळांची आरास व धार्मिक विधी यानिमित्ताने मंदिरामध्ये पार पडले.

गुरुवारी पहाटे 3 वाजता ब्रह्मणस्पती सूक्त, पहाटे 4 ते सकाळी 6 दरम्यान गायिका सन्मिता धापटे-शिंदे यांचा स्वराभिषेक हा गायनाचा कार्यक्रम आणि सकाळी 8 वाजता गणेश याग देखील पार पडला. दरवर्षी उमांगमलज जन्मोत्सवानिमित्त ‘दगडूशेठ’ गणपतीला 1100 नारळांचा नैवेद्य दाखवला जातो. तर ही सजावट पाहण्यासाठी पुणेकरांनी सकाळपासून गर्दी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये