पुण्यातील खराडी भागात १२ दुकानांना भीषण आग; लाखोंचं नुकसान

पुणे : बुधवारी सकाळी पुणे नगर रोडवरती खराडी जकात नाका येथे शॉर्टसर्किटमुळे मोबाईल, फर्निचर आणि ईतर १२ दुकानांना मोठ्या प्रमाणात आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल एक तास लागल्यानं दुकानदारांच मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे. सुदैवानं कसलीही जीवित हानी झाली नाही.
सकाळी 10 च्या सुमारास लागलेली आग सकाळी 11 वाजेपर्यंत अग्निशमन दलाकडून आटोक्यात आणण्यात आली आणि त्यानंतर कुलिंग ऑपरेशन करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आग बघणाऱ्यांची संख्या मोठया अप्रमाणात असल्यानं रोडवरती मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक देखील झाली होती. खराडी भागात यापूर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत. पुण्यातून अग्निशमन दलाच्या गाड्या इथपर्यंत पोहोचायला वेळ लागत असल्यानं आग मोठया प्रमाणात लागते आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतं. या भागात अग्निशमन दलाच्या शाखेचं काम सुरु आहे मात्र निधीअभावी ते अजून पूर्ण झालं नसल्याची माहिती आहे.