पुणे

गजर प्रतिष्ठाना पथकाचा १२वा वर्धापनदिन

पुण्यातील नामांकित ढोल, ताशा आणि ध्वज पथक गजर प्रतिष्ठानचा १२वा वर्धापन दिवस टेंभेकर मळा येथे उत्साहात साजरा झाला. एक तप पूर्ण करुन पथकाने १३व्या वर्षात पदार्पण केले.

गजर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिकेत पोटे आणि सभासद यावेळी उपस्थित होते. विविध खेळाडूंनी एकत्र येऊन या पथकाची स्थापना केल्याने हे पथक वैशिष्ट्यपूर्ण आहे. इतर कोणत्याही पथकातून वेगळे न होता तयार झालेले हे पथक सभासदांप्रमाणेच खेळाडू वृत्तीने बहरत आहे.

वादनाबरोबरच सामाजिक बाबींचे भान ठेऊन पूरग्रस्तांना मदत, वारकरी सेवा, हडपसर येथील अनाथ आश्रमाला मदत, रक्तदान शिबिर असे अनेक उपक्रम या प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात आले आहेत.

गेल्या पंधरवड्यापूर्वी पुण्यात आलेल्या पुरामुळे नदीपात्रातील काही ढोल पथकांचे ढोल वाहून गेल्यावर मित्रत्वाच्या नात्याने १० ढोल ढोल-ताशा महासंघाकडे सुपूर्त करण्यात आले.

गजर प्रतिष्ठानच्या सरावाचा शुभारंभ युवा उद्योजक आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सववाचे उत्सवप्रमुख पुनीत आणि जान्हवी बालन या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, ढोल ताशा महासंघाचे पराग ठाकूर, अभिजित टेंभेकर आदी उपस्थित होते. गजर प्रतिष्ठान पुणेचे अध्यक्ष अनिकेत पोटे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले तर शिरीन गोडबोले यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये