आज बारावीचा निकाल होणार जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? जाणून घ्या

मुंबई | HSC Result 2023 – आज (25 मे) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल (HSC Result 2023) जाहीर केला जाणार आहे. लवकरच हा निकाल जाहीर होईल. तसंच हा निकाल विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाईवरून दुपारी 2 वाजता ऑनलाईन पद्धतीनं पाहता येणार आहे.
एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेली बारावी बोर्डाची परीक्षा पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागात घेण्यात आली होती. तसंच या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेल गुण शिक्षण मंडळांमार्फत मंडळाच्या वेबसाइटवर दुपारी 2 वाजता उपलब्ध होणार आहेत.
निकाल कुठे पाहाल?
बारावीचा ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
- www.mahresult.nic.in
- www.hscresult.mkcl.org
www.mahresult.nic.in या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालासोबतच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसंच www.mahahscboard.in या वेबसाइटवर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होणार आहे.
निकाल कसा पाहायचा?
1) बारावीचा निकाल पाहण्यासाठी सगळ्यात आधी अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
2) वेबसाइटवर गेल्यानंतर बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
3) तिथे तुमचा रोल नंबर, जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.
4) संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर बारावीचा निकाल दिसेल.