ताज्या बातम्यामनोरंजन

“महिनाभर 15 लोकांकडून रोज बलात्कार झाला…”, अभिनेत्री अदा शर्माचं मोठं वक्तव्य

मुंबई | Adah Sharma – सध्या ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. जरी हा चित्रपट वादात सापडला असला तरी या चित्रपटानं बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे. तसंच या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) देखील चांगलीच प्रसिद्धीझोतात आली आहे. सगळीकडे तिच्या भूमिकेचं कौतुक होताना दिसत आहे. तर नुकतीच ‘द केरला स्टोरी’च्या टीमनं माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अदा शर्मानं मोठं वक्तव्य केलं आहे.

विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरून अदा शर्माचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत अदा शर्मानं चित्रपटातील काही मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. “तुमच्यावर 15 लोकांनी बलात्कार केला आहे, हे तुम्ही कसं सिद्ध करून दाखवाल? महिनाभर 15 लोकांकडून रोज बलात्कार झाला, ही गोष्ट सिद्ध करणं थोडं कठीण आहे”, असं अदा शर्मा म्हणाली.

“प्रेमात फसवलं गेलं, तर त्याची दखल घेतली जात नाही. तसंच माझ्यावर बलात्कार झाला, त्यानं मला त्या जागी स्पर्श केला, हे आपण लिहू शकत नाही. मी पीडित असलेल्या मुलींना भेटले. मी देखील एक मुलगी आहे. त्या मुलींचं दु:ख मी समजू शकते. आपल्याला याबाबत कोणतेही प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे माहीत असूनही या पीडित मुली धैर्यानं समोर आल्या आहेत,” असंही अदा शर्मा म्हणाली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये