ताज्या बातम्यादेश - विदेश

हिमाचल प्रदेशात बस दरीत कोसळल्याने १६ जणांचा मृत्यू; पंतप्रधानांनी केले मदतीचे आश्वासन

नवी दिल्ली : सोमवारी सकाळी हिमाचल प्रदेशातील कुल्लुमध्ये बस दरीत कोसळल्याने १६ जणांचा मृत्यू झाला तर तीन जन गंभीर जखमी झाले आहेत. कुल्लू येथील जंगला या गावाजवळ सकाळी ही घटना घडली यात विद्यार्थ्यांचा देखील समावेश होता. बसमध्ये ४५ प्रवासी प्रवास करत होते. जखमी झालेल्या प्रवाशांना नजीकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेवर दुख व्यक्त केलं आहे. ट्विट करून त्यांनी मृत्तांच्या कुटुंबाला प्रत्येकी २ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. “हिमाचल प्रदेव्शातील कुल्लू येथे घडलेली घटना अत्यंत दुखद असून याप्रसंगी आम्ही मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांसोबत असल्याचं त्यांनी म्हटल आहे.”

जखमी असलेल्या प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. जखमी असलेल्या प्रवाशांना प्रत्येकी ५०,००० रुपयांच्या मदतीचे आश्वासन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये