अश्लील कंटेट दाखवणारे 18 OTT प्लॅटफॉर्म केंद्र सरकारने केले ब्लॉक!
नवी दिल्ली | सध्या देशात कित्येक ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्रासपणे अश्लील अन् हिंसक कंटेंट दाखवला जातो. मात्र आता अशा प्लॅटफॉर्म्सवर मोदी सरकारने मोठी कारवाई केली आहे. व्हल्गर कंटेंट दाखवणाऱ्या 18 OTT प्लॅटफॉर्म्सना सरकारने ब्लॉक केलं आहे. प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी 18 ओटीटी प्लॅटफॉर्मवर अश्लील कंटेट दाखवल्याप्रकरणी कारवाई केली आहे.
माहिती तंत्रज्ञान अॅक्ट, 2000 अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. कोणतीही बंधने नसल्याने अश्लील कटेंट दाखवणारी अनेक ॲप्स ओटीटीवर सुरू होती. अनेक वेळा सूचना देऊनही अश्लील कंटेट दाखवल्याने या प्लॅटफॉर्मवर आता कारवाई केली गेली आहे. केंद्राच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ओटीटीवरील अशा तब्बल 18 ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घालून ती ब्लॉक करण्यात आली आहेत. पोर्नोग्राफी आणि अश्लील कंटेट दाखवणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही कारवाई करण्यात आली आहे. ड्रीम्स फिल्म्स, एक्स प्राइम यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा यात समावेश आहे.
यासोबतच 19 वेबसाइट, 10 ॲप्स आणि 57 सोशल मीडिया अकाऊंटवरही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय वूवी, येस्मा, अनकट अड्डा, ट्राई फ्लिक्स, नियॉन एक्स वीआईपी, बेशरम, शिकारी, खरगोश, एक्स्ट्रामूड, न्यूफ़्लिक्स, मूडएक्स, मोजफ्लिक्स, हॉट शॉट्स वीआईपी, फुगी, चिकूफ़्लिक्स, प्राइम प्ले हे OTT प्लॅटफॉर्म ब्लॉक करण्यात आले आहेत. तसेच फेसबुकवरील 12, इन्स्टाग्रामवरील 17, X वरील 16 अकाऊंट आणि युट्यूब वरील 12 चॅनेलवर कारवाई करण्यात आली आहे.