महाराष्ट्र

कांद्याला प्रतिक्विंटल १८५० रुपयांचा दर

पारनेर : पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (१३ जुलै) कांद्याची आवक दुपटीने वाढली. यावेळी शेतकर्‍यांनी ४ हजार १४७ कांदा गोण्या विक्रीसाठी आणल्या होत्या. मागील आठवड्याच्या तुलनेत सुमा २ हजार कांदा गोण्यांची आवक वाढली. पारनेर बाजार समितीमध्ये बुधवारी झालेल्या लिलावात ७ ते ८ लॉटला सर्वाधिक प्रतिक्विंटल १५०० ते १८५० रुपये भाव मिळाला. एक नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल १००० ते १४०० रुपये भाव मिळाला. माणसाच्या जेवणात अनेक प्रकारचे पदार्थ असतात. परंतु प्रत्येक वेळेस जेवण करीत असताना कापलेला कांदा चवीसाठी खायला सर्वांनाच लागत असतो. भारतात अनेक राज्यांमध्ये कांद्याचा वापर रोजच्या आहारात केला जातो.

कच्च्या कांद्याला उग्र वास आणि चव असते, परंतु तो शिजवला असता त्याची चव बदलून गोडसर होते. कांद्याची भाजी केली जाते. तसेच तोंडी लावणे, कोशिंबीर, चटणी यात कच्च्या कांद्याचा उपयोग होतो. कांद्याच्या पातीपासूनसुद्धा भाजी, झुणका इ. पदार्थ केले जातात. आता पावसाळ्यामुळे कमी झालेली कांद्याची आवक वाढली आहे.मागील आठवड्यात आषाढी एकादशीमुळे कांद्याची आवक घटली होती, परंतु आषाढी एकादशीनंतर पारनेर बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याचे दिसून आले. पारनेर बाजार समितीमध्ये १० जुलै रोजी सुमा २ हजार ५६ कांदा गोण्यांची आवक झाली होती, परंतु बुधवारी (१३ जुलै) ४ हजार १४७ कांदा गोण्यांची आवक झाली. बुधवारी झालेल्या लिलावात ७ ते ८ लॉटला प्रतिक्विंटल सर्वाधिक म्हणजे १५०० ते १८५० रुपये भाव मिळाला. एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल १००० ते १४०० रुपये भाव मिळाला, तर दोन नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल ७०० ते ९०० रुपये भाव मिळाला, तर तीन नंबर कांद्याला प्रतिक्विंटल २०० ते ६०० रुपये भाव मिळाला, अशी माहिती
पारनेर बाजार समितीचे सचिव शिवाजी पानस यांनी दिली.

चालू खरीप हंगामात नगर जिल्ह्यात सुमा ३ हजार १९४ हेक्टरवर कांदा पिकाची लागवड झाली आहे. मागील रब्बी हंगामात १ लाख ९० हजार ५२९ हेक्टरवर कांदा पिकाची लागवड झाली होती. यातून जिल्ह्यात ३७ लाख ९८ हजार १९५ टन कांद्याचे उत्पादन झाले होते. दरम्यान, जिल्ह्यातील राहुरी, राहाता, नगर तालुका बाजार समितीत कांद्याची आवक वाढली असून, कांद्याला प्रतिक्विंटल १८०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. सध्या जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून दमदार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे व वातावरणातील बदलामुळे हवेतील आर्द्रता वाढून साठवून ठेवलेला कांदा खराब होण्याची शक्यता असते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये