ताज्या बातम्यापुणे

पुण्यातील नदीजोड प्रकल्पाच्या बोगद्यात पाण्यासाठी उतरलेल्या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू !

पुणे | इंदापूर तालुक्यामध्ये सुरु असलेल्या नीरा-भिमा नदी जोड प्रकल्पाचे काम वेगाने सुरु असताना अशातच एक दुर्घटना घडली आहे. आतापर्यंत 300 फूट हा बोगदा तयार झाला असून त्यात उतरताच शेतकर्यांचे संतुलन बिघडले आणि ते 275 फूट खाली कोसळले. या दोन शेतकऱ्यांचा शोध घेण्यासाठी रात्रभर रेस्क्यू अभियान राबवण्यात आले. त्यानंतर त्यांचा तपास लागला. दोन्ही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडमधील उत्तरकाशी बोगद्यात 11 दिवसांपासून 41 मजूर अडकले आहे. त्यांना सोडवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असताना पुणे जिल्ह्यात हा प्रकार घडला.

नेमकं काय घडलं

या बोगद्यात इंदापूर तालुक्यातील दोन शेतकरी कोसळल्याची ही धक्कादायक घटना बुधवारी घडली. अनिल बापूराव नरूटे आणि रतिलाल बलभीम नरोटे हे दोन्ही शेतकरी बोगद्यातील पाणी शेतीसाठी देण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी बोगद्यात विद्युत पंप त्यांना बसवायचा होता. दोन्ही जण बोगद्यात उतरले तेव्हा त्यांचे संतुलन बिघडले आणि ते बोगद्यात पडले. या प्रकाराची माहिती स्थानिक लोकांना मिळाली. त्यानंतर त्यांनी ठेकेदाराशी आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क केला.

शेतकरी पडल्याची माहिती मिळाल्यावर ठेकेदाराने मोठी क्रेन मागवली आणि शोध सुरु केला. या दोघांचा ही रात्री उशीरापर्यंत शोध सुरु होता.अखेर रात्री साडेअकरा पावणेबाराच्या सुमारास या दोघांचेही मृतदेह शोधण्यात स्थानिक नागरिकांसह प्रशासनाला यश आले आहे. अनिल बापूराव नरूटे आणि रतिलाल बलभीम नरोटे अशी या दोन शेतकऱ्यांची नावे असून ते इंदापूर तालुक्यातील काझड येथील सिध्देश्वर वस्ती येथील रहिवासी आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. दरम्यान या घटनेमुळे काझड गावावर शोककळा पसरली आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांनी बोगद्यात जाऊ नये, असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये