पुण्यात झिका व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील एकूण रुग्णांची संख्या ६६ झाली असून २६ गर्भवती महिलांना झिका विषाणूची लागण झाली आहे. यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
पावसाळा असल्याने अनेक आजार डोकं वर काढत असतानाच पुण्यात झिका व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. या व्हायरसचा सर्वाधिक धोका गरोदर महिलांना आहे. शहरातील २६ गर्भवती महिलांना झिका विषाणूची लागण झाली आहे. या महिलांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी होणार आहे.पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात असल्याचे पुणे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी सांगितले.