महाराष्ट्र

पुणे जिल्ह्यात मागील महिनाभरात सरासरीच्या 31 टक्के पाऊस

पुणे जिल्ह्यात पावसाने सरासरी ओलांडली असून सरासरीच्या तुलनेत ३१ टक्के पाऊस पडला आहे. तर संपूर्ण राज्याचा विचार केला तर आत्ता पर्यंत ३४ टक्के पावसाची नोंद कऱण्यात आली आहे, त्यात सर्वाधिक पाऊस अहमदनगर जिल्ह्यात सरासरीच्या १३२ टक्के पडला. मुंबई उपनगर, जळगाव, सिंधुदुर्ग, बीड आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा खूप जास्त पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

राज्यात एक ते १७ जुलैदरम्यान सरासरी १७३.२ मिलिमीटर पाऊस पडला. त्या तुलनेत प्रत्यक्षात २३१.९मिलिमीटर (सरासरीच्या तुलनेत ३४ टक्के) पावसाची नोंद झाली. या महिन्यात आतापर्यंत अहमदनगरमध्ये सर्वाधिक पाऊस पडला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात जुलैच्या मध्यापर्यंत सामान्यतः ५३.१ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा सरासरीपेक्षा १३२ टक्के जास्त म्हणजे १२३ मिलिमीटर पाऊस पडल्याचे विभागाने सांगितले.

मुंबई उपनगरात ९१७.१ मिलिमीटर(८५ टक्के)
सिंधुदुर्ग ११८३.१ मिलिमीटर(१०७ टक्के)
जळगाव १६३.७ मिलिमीटर (६३ टक्के)
बीड १२६.९ मिलिमीटर (९२ टक्के)
यवतमाळ २३० मिलिमीटर (६८ टक्के)

राज्यात हिंगोली आणि उस्मानाबाद येथे सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे; तर सातारा जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली. जिल्ह्यात एक जून ते १७ जुलैदरम्यान सरासरी १६५.७ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा २१७.९ (३१ टक्के) पाऊस पडल्याचेही विभागाने स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये