धक्कादायक! रेल्वेतील 40 प्रवाशांना अन्नातून विषबाधा; ससून रुग्णालयात उपचार सुरु
पुणे | चेन्नईहून पुण्याकडे येत असलेल्या भारत गौरव यात्रा (Bharat Gaurav Yatra) रेल्वेमधील जवळपास 40 प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली. सर्व प्रवाशांना उपचारासाठी पुण्यातील (Pune News) ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) दाखल करण्यात आले. विषबाधा झालेल्या प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. (Health Update)
अधिक माहिती अशी की, चेन्नईहून पुण्याकडे येणारी ही रेल्वे मध्यरात्री पुणे रेल्वे स्टेशनला पोहचली. तेव्हा रेल्वेमधील काही प्रवाशांना अचानक उलट्या तसेच मळमळीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे प्लॅटफॉर्मवरच त्यांच्यावर प्राथामिक उपचार करण्यात आले. त्यानंतर या प्रवाशांना ससून रुग्णालयात दाखल केले. रेल्वेमध्ये सध्या पेन्ट्री कार काढून टाकण्यात आल्या आहेत. मात्र काही रेल्वेगाड्यांमध्ये खानपानाची सोय देण्यात आली आहे. अनेकदा सकाळी पॅक केलेल अन्न सायंकाळी, रात्री देण्यात येते त्यामुळे हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.