ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्र

मोठी बातमी! लोकसभेत सुप्रिया सुळे,अमोल कोल्हेंसह 49 खासदार निलंबित

नवी दिल्ली | Parliament Winter Session : लोकसभेतून (Lok Sabha) मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासह आणखी 49 खासदारांना निलंबित (Suspended) करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री अर्जन राम मेघवाल यांनी 49 खासदारांना निलंबित केलं आहे.

अर्जुन राम मेघवाल यांनी सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह मनीषा तिवारी, किर्ती चिदंबरम, शशी थरूर, डिंपल यादव, मोहम्मद फैसल, सुदीप बंदोपाध्याय, दानिश अली यांच्यासह विरोधा पक्षांच्या अन्य खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

लोकसभेत आज विरोधकांनी संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरलं. तसंच विरोधकांनी संसदेच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्याची मागणी करत गोंधळ सुरू केला. त्यामुळे लोकसभेत अध्यक्षांचा अपमान करणाऱ्या खासदारांना आज पुन्हा निलंबित करण्यात आलं आहे.

दरम्यान, लोकसभेतून आज 41 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. सोबतच 8 राज्यसभा खासदारांनाही निलंबित करण्यात आलं आहे. आत्तापर्यंत दोन्ही सभागृहातील 141 खासदारांवर कारवाई करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये