देश - विदेश

हाय गरमी! दिल्लीमध्ये तीन दिवसात उष्माघाताने ५ जणांचा मृत्यू

गेल्या आठ दिवसांपासून दिल्लीसह उत्तरभारतात उष्णतेची लाट असून पुन्हा काही दिवस ही लाट कायम राहिल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गेल्या तीन दिवसात दिल्लीत ५ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. तसेच उष्माघातामुळे रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्यांची संख्याही वाढली आहे.

दिल्लीमध्ये यावर्षी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेली उष्णतेची लाट कमी होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. आज, बुधवारीसुद्धा दुपारपर्यंत कमाल तापमानाची नोंद ४३ अंश सेल्शिअस एवढी झाली आहे.

हेही वाचा- विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुकीची घोषणा, या दिवशी होणार मतदान!

रात्रीच्यावेळी सुद्धा तापमानात फारशी घट होत नसल्याने उष्माघाताने आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. दिल्लीचे मंगळवार रात्रीचे किमान तापमान सुद्धा ३३ अंश सेल्शियस एवढे राहिले आहे. यामुळे विजेच्या मागणीमध्ये सुद्धा दिल्लीत वाढ झाली आहे. दिल्लीतील हे रात्रीचे सर्वाधिक किमान तापमान असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. आता दिल्लीत ८ हजार मेगावैट विजेची मागणी आहे. दिल्लीतील राममनोहर लोहिया रुग्णालय, लोकनायक जयप्रकाश व सफदरजंग हॉस्पीटलमध्ये सुद्धा उष्माघाताचे ४० रुग्ण उपचार घेत आहेत.

हेही वाचा- राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार जोरदार सरी

उत्तर भारतातील पंजाब, उत्तराखंड, राजस्थान, बिहार व हिमाचलप्रदेशात सुद्धा उष्णतामानात वाढ झाली आहे. या सर्व राज्यांमध्ये कमाल तापमान ४१ अंश सेल्शियसपेक्षा अधिक आहे. हरीद्वारमध्ये सुद्धा कमाल तापमानाची नोंद ४१ अंश सेल्शियस एवढी झाली आहे.

हेही वाचा- “जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका…” मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन

एवढ्यात दिलासा नाही

बिहारमध्ये मौसमी वाऱ्याची काहीशी हालचाल झाल्याने तेथे तापमानात घट झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. परंतु ही घट तात्कालिक असून मान्सूनचे आगमन झाल्याशिवाय तापमानात घट होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. यामुळे संपूर्ण उत्तर भारतासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. देशात आतापर्यंत केवळ 64.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे हे प्रमाण सरासरीपेक्षा 20 टक्क्यांनी कमी असल्याने उष्णतेच्या लाटेत एवढ्यात घट होणार नाही.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये