आरोग्यताज्या बातम्यापुणे

‘झिका’चा पुण्यात पहिला रुग्ण; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर!

पुणे | जिल्ह्यात (Zika Virus In Pune) झिका व्हायरसची एन्ट्री झाली असून जिल्ह्यातील येरवडा येथे झिका व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला आहे. ऑक्टोबरपासून इचलकरंजीमध्ये झिकाचे दोन रुग्ण आढळले आहेत, तर पुणे, पंढरपूर आणि कोल्हापूरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. शेजारील कर्नाटकमध्येही या आजारांची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या आहेत.

पुण्यात आढळला पहिला रुग्ण

येरवड्यातील प्रतीकनगरमध्ये हा रुग्ण सापडला असून आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. झिकाचा संसर्ग झालेली 64 वर्षांची महिला आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरी- चिंचवडमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम झाला होता. त्याला या महिलेने हजेरी लावली होती. त्यानंतर तिला ताप आला आणि अंगदुखीचा त्रास होऊ लागला. तिला पुण्यातील खासगी रुणालयात दाखल करण्यात आले. तिच्या तपासणीत अखेर झिकाचे निदान झाले. दरम्यान, पिंपरी- चिंचवडमधील सांस्कृतिक कार्यक्रमाला केरळमधील अनेक जण उपस्थित होते. त्यातील एखाद्या बाधित व्यक्तीकडून या महिलेला संसर्ग झाला असू शकतो, असे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. प्रतापसिंह सारणीकर यांनी झिका रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी प्रतिक नगर येरवडा येथे प्रत्यक्ष रुग्णाची भेट घेतली. रुग्णाची विचारपूस करून तब्येतीची काळजी घेण्यास सांगण्यात आले. त्याचप्रमाणे पुणे महापालिकेच्या कर्मचा-यांना झिका रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याचे आदेश देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये