पुणे
शहाळे महोत्सव : श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ५हजार शहाळ्याचा नैवेद्य

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आज पुष्टीपती विनायक जयंती निमित्त शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या मोहोत्सवानिमित्त ५हजार शहाळ्याचं नैवेद्य गणपती बाप्पाला दाखविण्यात आला आहे.
वैशाख वणव्यापासून देशवासियांचे रक्षण व्हावे. दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष शेतक-यांच्या समस्या श्रींच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात, आणि आरोग्य संपन्न भारत व्हावा या सद्भावनेने शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. भारतामध्ये वैशाख पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे. याच दिवशी गणपतीचा पुष्टीपती विनायक हा अवतार झाला होता.
वैशाख पौर्णिमेनिमित्त दुसऱ्या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार असल्याची माहितीही, ट्रस्टतर्फे देण्यात आली आहे.